
जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे,” -आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यात ३६ हजार करोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.ते जालन्यात बोलत होते.
“आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे,” असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.याशिवाय निर्बध कडक करावे लागतील असा इशारा देखील टोपे यांनी दिलाय. मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले जातील असंही टोपे म्हणाले. करोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही असंही टोपे म्हणाले. निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असंही त्यांनी म्हटलंय.
www.konkantoday.com