
गावखडी आरती प्रकरणी आरोग्य विभागाकडून चुकीचे नावे दिल्याचा माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष उर्फ बाबू तोडणकर यांचा आरोप
गावखडी येथे कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आरतीसाठी गेलेल्या काही जणांना आरोग्य विभागाकडून कोरन टाई न करण्यात आले आहे मात्र आरोग्य विभागाने कोणतीही खात्री न करता आरतीला उपस्थित नसलेल्यांची नावेही घातली असल्याचा आरोप गावखडी चे तंटामुक्ती समितीचे चे माजी अध्यक्ष व व रामेश्वर ग्रुपचे संतोष उर्फ बाबू तोडणकर यांनी केला आहे ज्या घरात आरती झाली त्यातील एका चा अहवाल पॉझिटिव आल्याने आरोग्य खात्याने आरतीला उपस्थित असल्याच्या कारणावरून काहीजणांना कोरन टाईन केले आहे मात्र त्यामध्ये अनेक जण आरतीला उपस्थित नव्हते आरती साठी केवळ आठ ते दहा जण उपस्थित होते तरीदेखील आरोग्य विभागाने 24 जणांचे यादी काढली विशेष म्हणजे त्यातील एक जण त्या दिवशी एका कंपनीत ड्युटीवर असताना देखील त्याचे नाव
कोरन टाईन यादीत घालण्यात आले आहे आता संबंधित युवकाने त्याला विरोध केला असता आरोग्य विभाग तुम्ही कंपनीकडून उलटे पत्र घेऊन या असे सांगत आहे हे चुकीचे आहे या सर्व प्रकाराबाबत बाबू तोडणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे आपण व आपला रामेश्वर ग्रुप कोरोना च्या बाबतीत सुरुवातीपासून काम करीत आहोत ग्रुपच्या वतीने गावात जंतूनाशक फवारणी पासून कामे केली आहेत असे असताना आरोग्य विभागाने स्थानिकांना विश्वासात न घेता व माहिती न घेता यादी बनवण्याचा आरोपही त्यांनी केला आहे याबाबत काल ग्रामपंचायत सभा झाली त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आरोग्य विभागाने जे खरोखर आरतीला उपस्थित असतील त्यांच्यावरकोरन टाईन करण्याचे कारवाई योग्य ठरेल कारण ते गावाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे परंतु अनेक जण तेथे उपस्थित नसतानाही त्यांची नावे यादीत आल्याने आरोग्य विभागाने ही नावेघेतली व त्याबाबत कोणती खात्री केली आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे यामुळे गणपती सणा रख्या भाविकांच्या श्रद्धेच्या ठिकाणी चुकीचे संदेश समाजात जात आहेत अशी खंत तोडणकर यांनी व्यक्त केली आहे याबाबत आरोग्य विभाग व प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन यात सुधारणा करावी अशी मागणी तोडणकर यांनी केली आहे
www.konkantoday.com