
चिपळूण शहरातील दिव्यांगांना २८.२७ लाखाचे अनुदान वाटप
चिपळूण ः दिव्यांग स्वावलंबी व्हावेत किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे आवश्यक असलेली वस्तू किंवा मदत व्हावी यासाठी येथील नगर परिषदेने अपंगांसाठी ५ टक्के राखीव निधीतून तब्बल २८ लाख २७ हजार ९०२ रुपयांचा निधी ५७ दिव्यांगांना एका कार्यक्रमात वाटप करण्यात आला. विशेष म्हणजे यानिमित्ताने दोन अपंगांना घरासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच तिघाजणांना रोजीरोटीसाठी व स्वतःच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी खावटी कर्जही देण्यात आले आहे. नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झ्रालेल्या या कार्यक्रमाला मुख्याधिकारी वैभव विधाते, नगरसेविका सौ. वर्षा जागुष्टे, सौ. सीमा रानडे, सौ. संजीवनी शिवगण, सौ. स्वाती दांडेकर, नगरसेवक विजय चितळे, मनोज शिंदे, शशिकांत मोदी, परिमल भोसले, आशिष खातू, संजय रेडीज, करामत मिठागरी, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, मालमत्ता व्यवस्थापक अनिल राजेशिर्के, राजू खातू, तसेच अन्य कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.