
शिवसेनेच्या वचननाम्यातील जनतेला दिलेली दहा प्रमुख वचन
१)आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार
२)राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार
३)विद्यार्थी एक्स्प्रेस
तालुका स्तरावर गाव ते शाळा / महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५०० विशेष बसची सेवा सुरू करणार
४)शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रु. १०,००० प्रतीवर्षी जमा करणार
५)३०० युनिट पर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार
६)राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण आखणार
७)१ रुपयात आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी राज्यभरात ‘१ रुपी क्लिनिक’ सुरु करणार.
८)निराधार पेन्शन योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार
९)१० रुपयांत सकस जेवणाची थाळी
१०)राज्यातील सर्व गावांमधील पारंपारिक धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन दुरूस्ती व देखभालीसाठी अनुदान देणार.
www.konkantoday.com