सार्वजनिक कार्यक्रमासाठी तहसिलदार, प्रांतांची परवानगी आवश्यक

लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, राजकीय मेळाव्यासाठी स्थानिक तहसिलदार, प्रांत यांची परवानगी आवश्यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत.
ओमीक्रॉन प्रकारामुळे कोविड विषाणूंचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंदीस्त सभागृह, मोकळी जागा, इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धार्मिक कार्यक्रम, मेळाव्यांच्या बाबतीत कोरोना विषाणूंचा फैलाव होणार नाही याची आयोजकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याची जबाबदारी उपविभागीय स्तरावरून दिली जाणार आहे. बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागेतील लग्नसमारंभासाठी संबंधित तहसिलदार, प्रांत यांना शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी देण्याबाबत प्राधिकृत करण्यात आले आहे. उर्वरित कार्यक्रमासाठी प्रांताची परवानगी आवश्यक आहे. शासन निर्देशानुसार दिलेल्या व्यक्तींच्या मर्यादेत अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याचे अधिकार प्रांताकडे आहे. प्रतिबंधीत क्षेत्र वगळून जिल्ह्याच्या उर्वरित क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जाहीर केेले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button