राजापूर पंचायत समिती सभेत जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था रत्नागिरी च्या अभिनंदनाचा ठराव ….
जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था रत्नागिरी च्या वतीने कोविड महामारीच्या वेळी कड्क लॉक डाऊन असताना रत्नागिरी येथील ऊमन्स हॉस्पिटल येथे जिल्हाभरातील अत्यवस्थ रुग्णांना दाखल केले जात होते. त्या ठिकाणी त्यांचे समवेत असलेले नातेवाईक याना जेवणाची व्यवस्था पतसंस्था च्या वतीने केली गेली हा उपक्रम सलग आठवडा भर राबविला गेला. तसेच चिपळूण येथील महापुरात चिपळूण खेड गुहागर येथील सभासदांचे आणि निसर्ग वादळात दापोली खेड मंडणगड येथील ज्या संस्थेच्या सभासदांचे नुकसान झाले त्या सर्व सभासदांना पतसंस्थेच्या वतीने आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदनाचा ठरव राजापूर पंचायत समिती सभेत मा. सभापती महोदय, तसेच सर्व सदस्य मोहदय आणि मा. गटविकास अधिकारी साहेब यांनी ठराव घेतला. या वेळी पतसंस्थेचे चेअरमन श्री परशुराम निवेंडकर व्हा. चेअरमन नंदकुमार मुंगशे आणि राजापूरचे संचालक मोहिते सह सर्व संचालकांचे अभिनंदन केले.
www.konkantoday.com