
भारत शिक्षण मंडळात व्यवसायाभिमुख व कौशल्य विकास अभ्यासक्रम केंद्राचे उद्घाटन
रत्नागिरी- भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचालित व्यवसायाभिमुख व कौशल्य विकास अभ्यासक्रम केंद्राचे उद्घाटन दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले.
व्यवसायाभिमुख व कौशल्य विकास अभ्यासक्रम केंद्राचे औपचारिक उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सी. ए. श्री. राजेंद्र संसारे व श्री मुकेश गुप्ता यांनी केले.
श्री. सी.ए. राजेंद्र संसारे यांनी विद्यार्थ्यांनी नुसते शिक्षण न घेता व्यवसायभिमुख प्रशिक्षण घ्यावे व त्याची प्रात्यक्षिक ज्ञानही दिले जावे तर निश्चितच विद्यार्थी यशस्वी होतील असे प्रतिपादन भारत शिक्षण मंडळ संचालित व्यवसायाभिमुख व कौशल्य विकास अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या मनोगतपर मार्गदर्शनातून मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासात्मक प्रशिक्षण घेताना आत्मविश्वास अंगी बाणवावा असे प्रतिपादन मुकेश गुप्ता यांनी केले. संस्थेचे उपकार्याध्यक्ष डाॅ.श्रीराम भावे यांनी स्वयंरोजगाराने आर्थिक स्तर सुधारण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. डाॅ.चंद्रशेखर केळकर यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा व जीवनात यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.
प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात व्यावसायिक शिक्षण महत्त्वाचे आहे असे सांगितले.उपप्राचार्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व्यवस्थापक सौ.वसुंधरा जाधव यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमातील २१ कोर्स पैकी ९ कोर्स १५ जानेवारी २०२२ पासून सुरु करत आहोत तरी मर्यादित जागेच्या बॅचेस असल्यामुळे जास्तीत जास्त असल्यामुळेच विद्यार्थ्यानी लवकरात आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन केले.
यावेळी भारत शिक्षण मंडळाचे सचिव सुनील उर्फ दादा वणजू, भा. शि. मं. चे विश्वस्त करंदीकर , भा
शि. मं. चे कार्यकारणी सदस्य विनायक हातखंबकर , कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मनोज जाधव, अॅड अाॅन कोर्सचे मार्गदर्शक प्रशिक्षक अनिल दांडेकर,नेहा साळवी, प्रा. वैभव कीर, प्रा. प्रथमेश भागवत, प्रा. आसावरी मयेकर तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
व्यवसायाभिमुख व कौशल्य विकास अभ्यासक्रम
पात्रता- १२ वी उत्तीर्ण , सर्व वयोगटासाठी खुले
- टॅली- अकाउंटींग
- टॅली- टॅक्सेशन TGT,TCS,GST
- सॉफ्ट स्किल- स्पीकींग इंग्लिश, बेसीक ग्रामर,अॅडव्हान्स ग्रामर, व्यक्तीमत्व विकास,
- कॉम्पुटराईस् अकाउंटींग
- न्यू एज्युकेशनल टुल्स
- फॅशन डिझाइनिंग बेसिक व फॅशन डिझाइनिंग अॅडव्हान्स.
www.konkantoday.com