‘प्लॅस्टिक बॉटल द्या आणि मोफत चहा वडापाव खा’
प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी पिपंरी- चिंचवड महापालिकेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ‘प्लॅस्टिक बॉटल द्या आणि मोफत चहा वडापाव खा’ या उपक्रमाची घोषणा केली आहे.उपक्रमात वडापाव विक्रेत्यांना सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेने वृत्तपत्रात जाहिरातही दिली आहे.
महापालिकेच्या या उपक्रमातंर्गत नागरिकांना काही ठराविक ठिकाणी या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना त्यांच्याकडील प्लॅस्टिक बॉटल वडापाव विक्रेत्यांकडे जमा करायच्या आहेत. त्यानंतर ते वडापाव विक्रेते नागरिकांना मोफत वडापाव आणि चहा देणार आहेत. या उपक्रमामुळे प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यास मदत मिळणार आहे.
www.konkantoday.com