
पालकमंत्री अनिल परब म्हणतील आणि ठरवतील, ती शिवसेना आम्ही मानत नाही,दापोलीतील शिवसैनिकांचा सूर
दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी येथील शिवसैनिकांवर दाखवलेल्या अविश्वासाने दापोली शहरातील शिवसैनिक नाराज आहेत.
पालकमंत्री अनिल परब म्हणतील आणि ठरवतील, ती शिवसेना आम्ही मानत नाही. पालकमंत्र्यांच्या येण्याआधीपासूनच आम्ही शिवसैनिक आहोत. निवडणुका येतच राहतील, पदे येतील, जातील. आम्ही आजन्म शिवसैनिकच राहणार, असे प्रतिपादन करत आमदार योगेश कदम यांचेच नेतृत्व आम्ही मानणार, असा नारा शहरातील शिवसैनिकांनी दिला.
दापोली शहरातील कोकंबाआळी येथील शिवसेना तालुका संपर्क कार्यालयासमोर माजी नगराध्यक्ष आणि शहर शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र पेठकर यांच्या उपस्थितीत शहरातील शिवसैनिकांनी शिवसेनेच्या जय जयकारच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडत आमदार योगेश कदम यांना पाठिंबा दर्शविला.
www.konkantoday.com