चिपळूण येथील बाजार पूल व बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना पूल हे ब्रिटिशकालीन पूल आता जमीनदोस्त होणार
चिपळूण : अतिवृष्टी कालावधीत नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करून पुराला कारणीभूत ठरत असलेले येथील बाजार पूल व बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना पूल हे दोन्ही ब्रिटिशकालीन पूल आता जमीनदोस्त होणार आहेत.जिल्हाधिकारी बी. एन पाटील यांनी पूल पाडण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार बाजार पूल हा पालिका आणि बहादूरशेख नाका पूल सार्वजनिक बांधकाम विभाग तोडणार आहे. नदीप्रवाहाला अडथळे निर्माण करणारे अन्य काही बांधकामे, उंचवटेही काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com