
आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार
कणकवलीतील शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित असलेले आ. नितेश राणे आणि माजी जि.प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांंनी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवार ७ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतरच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com