विद्यार्थ्यांला एकाच वेळी दोन वेळा डोस देण्यात आलेला नाही,आरोग्य खात्याचा खुलासा

रत्नागिरी जिल्हयामधील तालुका चिपळूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस येथे कोविड- 19 लसीकरण सत्र आज दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आले .
यावेळी एका विद्यार्थ्याला दोनदा डोस देण्यात आल्याचे वृत्त होते मात्र त्याबाबत आरोग्य विभागाने खुलासा केला आहे
या लसीकरणा दरम्यान 15 ते 18 वयोगटातील एक विद्यार्थी लस देत असतानाच घाबरुन गेल्यामुळे तो उठून उभा राहिला, त्यामुळे त्याला सुई टोचल्यासारखे वाटले. त्यामुळे त्याला पुन्हा जागेवर बसवून लस टोचण्यात आली असे प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस येथील वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले.

सदर विद्यार्थी घाबरुन गेल्यामुळे या विद्यार्थ्याला देखरेखीकरिता डॉक्टरांच्या निगरानीखाली उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे ठेवण्यात आले आहे . कोविड -19 लसीकरण सत्रामध्ये कोणालाही एकाच वेळी दोन वेळा डोस देण्यात आलेला नाही . तसेच सदर दिवशी लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांचा पाठपुरावा केला असता , देण्यात आलेल्या लसीचा त्रास कोणालाही झालेला नाही असे प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस येथील वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले आहे . कोविड- 19 लसीकरण 15 ते 18 वयोगटातील मुलांचे करताना ही मुले लहान असल्याने घाबरुन जाऊ शकतात , त्यामुळे लस टोचक व इतर कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी असे डॉ . श्री . अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी सांगितले .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button