
रत्नागिरी शहरातील १ लाख ६० हजार क्युबिक मिटर घनकचऱ्यावर ‘बायो मायनिंग’द्वारे प्रक्रिया
रत्नागिरी : शहरातील घनकचरा साळवी स्टॉप येथे डम्पिंग करण्यात येतो. अनेकदा येथे लागणाऱ्या आगीने साळवी स्टॉप, कोकण नगर आदी भागातील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागतो. मात्र हा
प्रश्न आता मार्गी लागण्याची सुरुवात झाली आहे. सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक मिटर साचलेल्या घनकचऱ्यावर बायो मायनिंग मशिनद्वारे प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्यात येत आहे. पालिकेचे माजी आरोग्य सभापती निमेश नायर यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न सुटला आहे. पहिल्या टप्प्यात २८ लाख रुपये खर्च करून ४ हजार क्युबिक मिटर कचरा कमी करण्यात आला. तर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पालिका या खताची विक्री करत असून त्याला चांगली मागणीही आहे.
www.konkantoday.com