खिणगिणीत भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत
भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून जीवदान दिले. खिणगिणी कदमवाडी येथे बुधवारी ही घटना घडली.
ग्रामस्थ प्रभाकर कदम यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. याबाबतची माहिती दूरध्वनीवरून मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सागर गोसावी, दीपक म्हादये, विजय म्हादये, प्रथमेश म्हादये यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढत पिंजऱ्यात जेरबंद केले. पाच तास ग्रामस्थांच्या मदतीने ही सुरू होती. सुमारे पाच वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या असून त्याची लांबी १७७ सेमी तर उंची ६१ सेमी आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.
www.konkantoday.com