रिचार्जचे प्लानचे दर वाढवल्याचा सामान्यांना फटका
रत्नागिरी : टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लानचे दर वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक अडचणीत टाकले आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी 35 रूपयांचा रिचार्ज 28 दिवसांसाठी केला होता. तोही रिचार्ज जनतेने सहन करत आपला नंबर चालू ठेवला आहे. त्यानंतर वर्षभरापूर्वी रिचार्ज वाढविले. आता पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना रिचार्ज वाढवून दणका दिला आहे. वोडाफोन, आयडिया एअरटेल नंतर आता जिओ रिचार्ज शुल्कातही वाढ झाली आहे. आपला मोबाईल नंबर सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावा लागत आहे. याआधी रिचार्ज संपल्यावर इनकमिंग कॉलसाठी कोणतीही मर्यादा नव्हती. आता मात्र रिचार्ज न केल्यास सात आठ दिवसांनी ही सुविधाही बंद केली जात आहे. त्यामुळे एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना महिन्याभराचा रिचार्ज करून आपला मोबाईल नंबर सुरु ठेवावा लागत आहे.
www.konkantoday.com