रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा उद्यापासून बंद , ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार – जिल्हाधिकारी बी एन पाटील
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा (प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक ) ६ पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णवाढीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
www.konkantoday.com