
दापाेली कृषी महाविद्यालयात ७ विद्यार्थी काेराेना पॉझिटिव्ह
दापोली येथे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात एकूण ४० विद्यार्थ्यांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी ७ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती दापोली तालूका आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे.काेराेनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय आज होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली हाेती आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कराेनाचा संसर्ग होत असल्याने चिंतेत भर पडली आहे
www.konkantoday.com