त्या नवजात बालकाच्या आईचा शोध घेण्यात पोलिसांना यश
चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील एका दर्ग्याजवळ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ५ दिवसाचे नवजात अर्भक आढळून आले होते. या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ तपास सुरू केला.तिन दिवसातच पोलिसांच्या प्रयत्नाला यश आले आहे. या नवजात बालकाच्या आईचा पोलिसांनी शोध घेतला असून मंगळवारी तिला ताब्यातही घेतले.
www.konkantoday.com