पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार ऑगस्टपासून बंद
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार ऑगस्टपासून बंद आहे. त्यामुळे शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नाही. राज्यभरातील पोषण आहार पुरवठादार निश्चित होत नसल्यामुळे विद्यार्थी वंचित राहिले आहेत.
माध्यान्य भोजन योजनेंतर्गत पहिली ते आठवीपर्यंच्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवला जातो. कोरोना काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळी व इतर वस्तू एकत्रितपणे पुरवल्या जात होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकही सुट्टीवर असल्यामुळे त्या काळातील पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकण्यासाठी त्याने बँक खाते उघडण्याचे आदेश दिले होते. त्याबाबतही गेल्या चार महिन्यांपासून घोळ सुरू आहे. त्यापच आधीच्या पुरवठादाराच्या कंत्राटाची मुदत संपल्यामुळे ऑगस्टपासून शिक्षण विभागाला होणारा पोषण आहार पुरवठा ठप्प आहे. यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. www.konkantoday.com