
गोव्यात कॉर्डेलिया क्रूझ कंपनीच्या एका क्रूझवरील तब्बल ६६ जण कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणात चर्चेचं केंद्रस्थान बनलेली कॉर्डिलिया क्रूझ कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.गोव्यात कॉर्डेलिया क्रूझ कंपनीच्या एका क्रूझवरील तब्बल ६६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गोवा प्रशासन आता चिंतेत पडलं आहे. क्रूझवरील एकूण २ हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील ६६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे क्रूझवरील प्रवाशांना खाली उतरवायचं की नाही याचा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com