आरटीओ विभागात सिम्युलेटर यंत्रणा
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहन चालवण्याच्या चाचणीसाठी नवीन ‘सिम्युलेटर’ ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
या सिम्युलेटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी अजित ताम्हणकर, मोटर निरीक्षक संतोष काटकर, ऋषिकेश कोराने, प्रसाद सानप आदी उपस्थित होते. यावेळी या यंत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनीही या यंत्रावर प्रात्यक्षिक केले.
वाहन कसे चालवायचे याचा सराव करून घेणाऱ्या सिम्युलेटर या अत्याधुनिक प्रणालीचा वाहन परवान्यासाठी चांगला फायदा होईल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी व्यक्त केले. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालवण्याची चाचणी देण्यासाठी येणाऱ्यांना चाचणीपूर्वी या सिम्युलेटरवर सराव करता येणार आहे. यात विविध कृत्रिमरित्या विविध परिस्थिती निर्माण केल्या आहेत. पावसाळा, धुकं, अंधार, घाटरस्ता, तीव्र उतार, तीव्र चढण यामुळे या यंत्रावर सराव करताना याची मदत होणार आहे.
www.konkantoday.com