
सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीचे केंद्राचे आदेश
——————————-–———–
सरकारी कार्यालयांतील कर्मचार्यांची उपस्थिती 50 टक्केच असायला हवी, उर्वरित कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे, असे निर्देश नव्या नियमावलीत केंद्र सरकारने दिले आहेत.
देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाचे प्रमाणही वाढू लागल्यामुळे केंद्राकडून सरकारी कर्मचार्यांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.
सरकारी अधिकारी अथवा कर्मचार्यांची गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रक ठरवण्याच्या सूचनाही केंद्राकडून सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत त्यांना कार्यालयात बोलावू नका, असे या नियमावलीत सूचविण्यात आले आहे. दिव्यांग कर्मचार्यांनाही कार्यालयात न बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्भवती महिलांनाही कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे.
www.konkantoday.com