जुई रवींद्र गांधी रॉक क्लाइंबिंग कोर्स करणारी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला ठरली
जुई रवींद्र गांधी रॉक क्लाइंबिंग कोर्स करणारी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला ठरली अाहे
29 नोव्हेंबर 2015 रोजी सह्याद्री माउंटेनीअरिंग गोगटे कॉलेज रत्नागिरी यांच्याकडून रॅपलिंग घेण्यात आलं होतं त्याला पूर्ण टेक्निकल सपोर्ट जिद्दी माउंटेनीअरिंगकडून देण्यात आला होता त्या इव्हेंटला जुई रवींद्र गांधी* हीने सहभाग घेतला होता, जुईला आधीपासूनच शाळेमधील गुरुकुलमुळे झालेली ट्रेकिंग बद्दलची आवड, त्यानंतर जुई जिद्दी माउंटेनीअरिंग बरोबरचे ट्रेक करत राहिली आणि त्यातूनच रॉक क्लाइंबिंगची आवड निर्माण झाली. पुढे 2016 पासून आर्टिफिशल क्लाइंबिंग वॉल वरती प्रॅक्टिस सुरू केली आणि 2017 साली लिंगाणा क्लाइंबिंग (रायगड) 3 ते 4 वेळा केला आणि खऱ्या अर्थाने रॉक क्लाइंबिंग सुरुवात झाली त्यानंतर कळकराय 150फूट (पुणे), तैलबैलाच्या चारही बाजू(पुणे), काळमब्याची लिंगी 1 450फूट, काळमब्याची लिंगी 2 450फुट (रत्नागिरी), स्कॉटिश कडा 400फूट (नाशिक) यांसारखे सुळके सर केले व इतरही सुळके क्लाइंबिंग मोहिमांमध्ये सहभाग कायम राहिला.
हे करत असताना स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनीअरिंग माउंट अबू येथे 2018 साली बेसिक रॉक क्लाइंबिंग, तसेच 2019 साली ऍडव्हान्स रॉक क्लाइंबिंग हे कोर्स यशस्वीपणे पूर्ण केले. एवढ्यावरच न थांबता त्या इन्स्टिट्यूट मधील अत्यंत महत्वाचा कोचिंग कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. हा कोर्स केल्यामुळे जुई आत्ता त्याच इन्स्टिट्यूट मध्ये गेस्ट इन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहू शकते.
*हे रॉक क्लाइंबिंग कोर्स करणारी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला आहे.
ती रत्नागिरीत येताच रेल्वे स्टेशनलाच जिद्दी माउंटेनीअरिंगच्या टीमने तिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
www.konkantoday.com