
शासकीय रूग्णालयात आता सीसीटीव्हीद्वारे शासनाची नजर
रूग्णालयात होणार्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय, कळंबणी, कामथे, दापोली उपजिल्हा रूग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तर दुसर्या टप्प्यात सर्व ग्रामीण रूग्णालयात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सर्व शासकीय रुग्णालय सीसीटव्हीचा प्रयोग करण्यात येणार असून राज्यातील ३९८ रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी शासनाने ४ कोटी २ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यातून जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, स्त्री रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयात सीसीटीव्ही बसवले जातील. मुख्य प्रवेशद्वार, बाह्य रूग्ण विभाग, पुरूष व महिला आंतररूग्ण विभाग, वैद्यकीय अधिकारी कक्ष, शस्त्रक्रियागृह आवारासह इतर आवश्यक ठिकाणी कॅमेरे लावले जातील.
www.konkantoday.com