
खेडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला पोलिस कोठडी
खेड तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करणार्या युवकाला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. त्याची रवानगी न्यायालयाने 8 दिवसासाठी पोलिस कोठडीत केली आहे.
खाडीपट्ट्यातील एका गावातील चौदा वर्षीय मुलीच्या पोटात दुखायला लागल्यावर तिला तिच्या आईने शहरातील एका दवाखान्यात वैद्यकीय तपासणीसाठी आणले. वैद्यकीय अधिकार्याने तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याची बाब लक्षात आली. या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिने या प्रकारास जबबादार असलेल्याची माहिती आईला दिली. पीडित मुलीच्या आईने खेड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित युवकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली व न्यायालयात हजर केले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.
www.konkantoday.com