ऐकावे ते नवलच! जिल्ह्यात 1600 जणांनी निवडला ‘समलिंगी लाईफ पार्टनर’
रत्नागिरी : न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता दिल्याने समलिंगी विवाह करणार्यांची संख्याही आता जिल्ह्यात वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 800 जोडप्यांनी हा विवाह केला आहे. नोंदणी न झालेल्यांची संख्या अधिक असू शकते. यात पुरुषांसह स्त्रियांचीही नोंदणी करण्यात आली आहे.
पूर्वी समलिंगी विवाह हा गुन्हा होता. कलम 377 नुसार हा गुन्हा सिद्ध झाल्यास दंड ठोठवण्यात येत होता. गुन्हेगारांना दहा वर्षे शिक्षाही दिली जात होती. मात्र अलिकडेच भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाने याबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार विवाह करण्यात येत आहेत. मात्र याची नोंदणी अनेकांनी केलेली नाही.
www.konkantoday.com