
आता राणे कुटुंबीयांना डिवचणारे बॅनर गिरगावमध्ये लावण्यात आले ,बॅनरवर नितेश राणे चक्क गायब असल्याचा दावा
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जामिनासाठी त्यांना आता उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. त्यामुळे अजूनही राणे अज्ञातवासात आहेत. ते नेमके कोठे आहेत. त्यांच्या ठावठिकाणा काय ? याची अजूनही कोणाला माहिती नसून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, आता राणे कुटुंबीयांना डिवचणारे बॅनर गिरगावमध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे चक्क गायब असल्याचा दावा करण्यात आलाय. नितेश राणे हरवले असून त्यांना शोधून देणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस दिली जाईल असेदेखील या बॅनरवर लिहण्यात आलंय. या बॅनरमुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
हे पोस्टर नेमके कोणी लावले याची माहिती मिळालेली नाही. मात्र भाजप आमदार नितेश राणे यांची ओळख सांगणारी माहिती देखील या बॅनवर लावण्यात आलीय. ही माहिती नितेश राणे यांना डिवचणारी आहे. या बॅनरमुळे आता तळकोकणातील शिवसेना विरुद्ध राणे हा शिमगा आता मुंबईतही सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालंय.
www.konkantoday.com