भाजपकडून समाजमाध्यमांमधून केला जाणारा विखारी प्रचार रोखण्यासाठी काँग्रेसचे १० हजार गांधीदूत सज्ज
भाजपकडून समाजमाध्यमांमधून केला जाणारा विखारी प्रचार रोखण्यासाठी काँग्रेसचे १० हजार गांधीदूत सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली.प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया मिशन १० हजार, या मोहिमेचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजप ह समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, परंतु भाजपच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा समाजमाध्यम विभाग सक्रिय झाला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे १० हजार गांधीदूत भाजपच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील.
www.konkantoday.com