100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत,नितेश राणे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
सिंधुदुर्गात शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतरच्या वादाचे पडसाद मुंबईतही उमटताना दिसून येत आहेत.
त्यातच, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आता, दादर येथे नितेश राणे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी तात्काळ ते बॅनर खाली उतरवले आहेत.दादर परिसरातील राणे समर्थकांनी नितेश राणेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली होती. त्यामध्ये, 100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा आशय लिहिण्यात आला होता. विशेष म्हणजे या बॅनरवर केंद्रीयमंत्री नारायण राणेंचाही फोटो झळकला आहे. या बॅनरबाजीसंदर्भात माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे बॅनर खाली उतरवले आहेत. दरम्यान, या बॅनरबाजीमुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com