लोकशाही दिन 3 जानेवारी रोजी

रत्नागिरी : जिल्हा स्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून माहे जानेवारी 2022 चा लोकशाही दिन सोमवार 03 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात न होता दूरदृश्य प्रणालीच्या (व्हिडीओ कॉन्फरन्स) माध्यमातून दुपारी 1 ते 2 वाजता या वेळेत होणार आहे.
या लोकशाही दिनाकरिता नागरिकांना संबंधित तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून दूरदृष्यप्रणाली द्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्स) लोकशाही दिनामध्ये सहभागी होता येईल.
लोकशाही दिनाकरीता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात. अर्जदार यांनी विहीत नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. विहीत नमुन्यामध्ये तसेच विहीत मुदतीत प्राप्त न झालेले अर्ज जिल्हा लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button