मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफ हाेणार

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याची सरकारची भूमिका आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.मुंबई महापालिका कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान शिंदे यांनी सांगितले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी सरकारने पालिकेचा करवाढीचा प्रस्ताव फेटाळला आह़े त्यामुळे पालिकेला वर्षांला एक हजार कोटींचा फटका बसणार आहे. तसेच ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याबाबत पालिकेने पाठविलेल्या प्रस्तावाशी सरकार सहमत आहे. मात्र केवळ सामान्य करात सूट न देता मालमत्ता व त्याअनुषंगाने लावण्यात येणाऱ्या सेवाशुल्कासह हा संपूर्ण कर माफ करण्यात येणार आहे. त्याबाबत योग्यवेळी निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button