जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार : मिलिंद किर यांची पत्रकार परिषदेत माहिती
साठवण टाक्या बांधण्यासाठी आलीमवाडीतील जागा खरेदीचा ठराव जिल्हाधिकार्यांनी योग्य ठरवला. हा ठराव रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद कीर यांनी केलेला अर्ज जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी फेटाळून लावला. याविरूद्ध आपण उच्च न्यायालयात अपील करून दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जागेची किंमत फारच वाढीव आहे. त्यात पंधरामाड, खडप मोहल्ला याठिकाणी पाणी पुरवठा व्हावा म्हणून टाकण्यात येणार्या जलवाहिनीचे अंतरही वाढले. यासाठी आणखी सव्वातीन कोटी रूपये खर्च वाढला. हा खर्च रनपच्या फंडातून करण्यात येणार असल्याने आणि रनपची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हा ठराव अधिनियम 308 अन्वये रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे अर्जाद्वारे किर यांनी केली होती.
साठवण टाकी बांधण्यासाठी खरेदी करण्याचा ठराव रत्नागिरी नगर परिषदेच्या सभेत बहुमतांनी पारित करण्यात आला होता.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी किर यांचा हा अर्ज फेटाळला होता.
www.konkantoday.com