केंद्रातील मंत्री गुन्हेगाराला पाठिशी घालत आहेत, लपवून ठेवत आहेत-खासदार विनायक राऊत
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या विरोधातील प्रकरणात नोटीस बजावली आहे.आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विनायक राऊत म्हणाले, “कणकवलीचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख सचिन सावंत आणि युवासेनेचे उप जिल्हा संघटक राजू राठोड यांनी कणकवली पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली आहे. यात नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का असे उद्गार काढले. यातून नितेश राणे कुठे आहेत हे नारायण राणे यांना १०० टक्के माहिती आहे. केंद्रातील मंत्री गुन्हेगाराला पाठिशी घालत आहेत, लपवून ठेवत आहेत. म्हणून पोलिसांनी राणेंची चौकशी करावी आणि नितेश राणे कुठे आहेत याची माहिती घ्यावी. तसेच आरोपीला पकडावं अशी मागणी करण्यात आली आहे.”
www.konkantoday.com