राज्यपालांनी मंजुरी दिली नाही तरी निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम
गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यपदाच्या निवडणुकीचा पेच अद्याप कायम आहे.
निवडणुकीत होणाऱ्या गुप्त मतदान पद्धतीत बदल करून आवाजी पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. आघाडी सरकारच्या या निर्णयावर भाजपने सडकून टीका केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली. परंतु, आवाजी मतदानानं निवडणूक घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. असा उल्लेख राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात केला आहे. असे असली तरी राज्यपालांनी मंजुरी दिली नाही तरी निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे पत्रही राज्यपालांना पाठवले आहे.
www.konkantoday.com