रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे चिपळूण बहादूरशेख नाका येथे वोल्वो गाडी खड्ड्यात गेली
मुंबई-गोवाच्या नूतनीकरणाच्या विलंबामुळे नाहक त्रास वाहनाना सहन करावा लागत आहे. दि. २७ डिसेंबर रोजी बहादूरशेख नाका शिवसागर हॉटेल येथे ४ चाकी मोठी वोल्वो गाडी रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे खड्यात घसरून खाली सरकली.नशिबाने काही जीवितहानी झाली नाही. त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक पवर हे तिथून जातं असताना परिस्थितीच गांभीर्य ओळखत वाहन चालकाला मदत देऊ केली. तमाम चिपळूण वासियांना या असल्या रस्त्याचा त्रास गेले कित्येक वर्ष सहन करावा लागत आहे. ठेकेदारने सदर रस्ता लवकर दुरुस्त करून लोकांची गैरसोय टाळवी अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com