
नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या पुन्हा सुनावणी; केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये दाखल
शिवसेनेचा कणकवलीतील कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाबाबत उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे. मंगळवारी तब्बल चार तास याबाबत सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने उद्या सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले नितेश हे वडील नारायण राणे यांच्यासोबत सिंधुदुर्गात उपस्थित झाले.
आमदार नितेश राणे यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सोमवारी नागपुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून कोकणात परतले. गोवा विमानतळावर नितेश आणि दोघे भेटल्यानंतर नारायण राणे यांनी ‘नितेश राणे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे ते अज्ञातवासात जाण्याचे कोणतेही कारण नाही,’ असे स्पष्ट केले होते.
www.konkantoday.com