जानेवारी महिन्यापासून कोकणातील शेतकर्‍यांना ड्रोन हाताळाण्याचे प्रशिक्षण दिले जाणार

काळाच्या ओघात शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पिकांवरील किडींचे नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी ड्रोनच्या वापराला केंद्र सरकारने काही नियमावली जारी केली आहे. आता ड्रोन वापराची प्रत्यक्ष गरज असून जानेवारी महिन्यापासून कोकणातील शेतकर्‍यांना ड्रोन कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी कोकण कृषी विद्यापीठात नव्या तंत्राची माहिती देण्यासाठी केंद्राची उपलब्धता करण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी ड्रोन किती महत्वाचे आहे, याची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ड्रोनच्या वापराने खरीपात पीकस्थिती, पीकपाहणी, किड रोग निर्मूलन, किडींचे व्यवस्थपान आदी कामे सुलभ होणार आहेत. पिकावर असलेली कीड आणि त्याचा प्रादुर्भाव ड्रोनच्या हाय डेफिनिशन कॅमेरा मुळे सहज पाहायला मिळणार आहे. किडीवर आळा घालण्यासाठी योग्य ती प्रमाणात औषधे वापरता येणार आहेत ड्रोनच्या वापरामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत औषधे फवारणी होणार आहे. जास्त उंचीवरून फवारणी केल्याने सगळीकडे समान फवारणी होणार आहे. बागयती क्षेत्रात हे तंत्र अवलंबिणे शक्य होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button