हिवाळी अधिवेशनास उपस्थित असणारे 32 जण कोरोना पॉझिटिव्ह,पोलीस, पत्रकार, विधिमंडळ आणि मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश
मुंबईत आणि राज्यात कोरोना आणि ओमायक्रोन रुग्णांचा आकडा काढत असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत सुरू असणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास उपस्थित असणारे 32 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.यामध्ये पोलीस, पत्रकार, विधिमंडळ आणि मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता कोरोना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाल्यावरही अधिवेशनास उपस्थित राहणारे मंत्री, आमदार यांच्यासह विधिमंडळ कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस व पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. सर्व गोष्टींची खबरदारी घेऊनसुद्धा ज्या गोष्टीची भीती होती तीच घटना अखेर घडली आहे. अधिवेशनात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
www.konkantoday.com