
रेल्वेस्टेशन येथून दुचाकी लांबवली
रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवार 22 डिसेंबर रोजी घडली आहे. याबाबत सुधीर शंकर मांडवकर (52, रा. आम्रपाली कॉम्पलेक्स निवखोल, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांनी आपल्या ताब्यातील एच.एफ.डिलक्स (एमएच-08-एयु-5229) रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील गिरीरत्न हॉटेल समोर पार्क केली होती. ती अज्ञाताने लांबवली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल जाधव करत आहेत.
www.konkantoday.com