
२ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसीचे राष्ट्रीय मेनु २०२४ शिबिर १५ ते २४ नोव्हेंबरपालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार ‘कोकण शौर्य’चा शुभारंभ
*रत्नागिरी, दि.2 : २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण शौर्य’ हे मेनु शिबिर होत आहे, अशी माहिती कमांडींग ऑफीसर कमांडर के. राजेश कुमार यांनी दिली.
स्वच्छ कोकण सुरक्षित कोकण हे ब्रीद घेऊन हे १० दिवसांचे शिबिर होणार आहे. कोकण शौर्य या शिबिराचा शुभांरभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अल्ट्राटेक जेटीवर होणार आहे. रत्नागिरी ते रणपार पावस, पूर्णगड, आंबोळगड, विजयदूर्ग आणि देवगड परत याच मार्गाने रत्नागिरी असा २३५ कि.मी. चा प्रवास असणार आहे. या शिबिरासाठी ६० राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट सहभागी होणार आहेत. स्वच्छता व सुरक्षित तटाबाबत पथनाट्य, कविता यांच्या माध्यमातून बाजारपेठ, शाळा मधून जनजागृती करण्यात येणार आहे. तटीय स्वच्छतेबरोबरच समुद्रामधील स्वच्छता विशेषत: प्लॅस्टिक निर्मूलन याबाबत जनजागृतीवर भर असणार आहे. यावेळी कार्यकारी अधिकारी अंकित रवी उपस्थित होते.
www.konkantoday.com