
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सरपंच व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.
केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने रत्नागिरी जिल्हामध्ये गावोगावी जल जीवन मिशन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गावातील कुटुंबांना सन 2024 पर्यंत ’हर घर नल से जल’ या प्रमाणे वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापुर्वक पाणी पुरवठा करणे आहे. जल जीवन मिशन कार्यक्रम हा केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्प असल्याने गाव स्तरावरील विविध घटकांची, संस्थांची व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्रमाच्या विविध टप्प्यावर क्षमता बांधणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांची कै.शामरावजी पेजे सभागृह, रत्नागिरी येथे आज दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आली होती.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सन्मा. श्री.विक्रांत जाधव,अध्यक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.डॉ.बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी रत्नागिरी, मा.डॉ.इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी आपल्या मनोगतामध्ये योजनेंतर्गत हर घर जल से नल या प्रमाणे वैयक्तीक नळ जोडणीव्दारे प्रती माणसी प्रती दिनी 55 लिटर शुध्द व गुणवत्तापुर्वक पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच या योजनेंतर्गत महिलांवर सकारात्मक परिणाम होणार असल्याने प्रत्येकाने ही योजना शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सहभाग घ्यावा. तसेच मा. डॉ.बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी यांनी कुठल्याही योजनेच्या यशासाठी लोकसहभाग फार महत्वाचा आहे.सरपंच हा गावच्या विकासाचा कणा आहे. गावाचा विकास साधण्यासाठी, गावाचा कायापालट करण्यासाठी संरपचांनी पुढाकार घेऊन शासनाच्या विविध योजनांची गावात प्रभावीपणे अंमलबजाणीकरणे गरजेचे आहे. मा. श्री.विक्रांत जाधव, अध्यक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी आपल्या मनोगतामध्ये गावाचा विकास साधण्यासाठी प्रत्येक गावाच्या सरपंचानी स्वच्छता अभियान, जल जीवन मिशन व मनरेगा या सारख्या योजना प्रभावीपणे राबवण्यिासाठी जबादारी घ्यावी. आपलं गाव सुजल गाव व आदर्श गाव तयार करा . गावातील सर्वांनी उत्तम गुणवत्तेचे काम करण्याचा प्रयत्न करा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या नात्याने कुठल्याही गावाला विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.
प्रशिक्षण कर्याशाळेला जल जीवन मिशन कार्यक्रम, सद्या स्थिती व आव्हाने या विषयी श्री.मंदार साठे, सल्लागार युनिसेफ मुंबई, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयी श्री. आनंद घोडके सल्लागार युनिसेफ मुंबई, जिल्हयाची भूशास्त्रीय रचना व भूजल उपलब्धता या विषयी




