
हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघाडी विरोधात अविश्वास ठराव आणावाच-अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघाडी विरोधात अविश्वास ठराव आणावाच. म्हणजे भाजपसोबत नेमकं कोण आहे ते तरी कळेल, असा खोचक टोला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अविश्वास ठरावाबाबतचं भाष्य केलं होतं. त्यावरून नवाब मलिक यांनी हा टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे त्यामुळे हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा म्हणजे त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहे हे समजेल, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.
www.konkantoday.com