राज्य सरकारकडून ओबीसींची फरपट थांबवा अन्यथा उद्रेक होईल

राज्य सरकारकडून ओबीसींची फरपट थांबवा अन्यथा उद्रेक होईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असून ओबीसी समन्वय समितीतर्फे काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गिते, रघुवीर शेलार, दिपक राऊत, नंदकुमार मोहीते, तानाजी कुळये यांच्यासह अनेक ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण वाचविण्यासाठी यापूर्वीच्या महायुतीच्या सरकारने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. विद्यमान सरकारकडून ओबीसींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु महाविकास आघाडीचे सरकारसुद्धा ओबीसींचे स्थगित झालेले आरक्षण वाचवू शकलेले नाही. कोणतेच सरकार ओबीसींच्या आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची भावना व तीव्र नाराजी समाजामध्ये निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button