
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल-फ्रान्सचे वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पास शिवसेनेने विरोध केला असतानाच हा फ्रान्सच्या सहकार्याने होत असलेला हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल असे प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी सोमवारी केले.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पास पुन्हा चालना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तर या प्रकल्पास आपला विरोध कायम असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वाद वाढत असतानाच फ्रान्सचे वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी राज्यपाल भगर्तंसह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली,
www.konkantoday.com