
चिपळुणात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी होण्याची शक्यता?
आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेस अद्यापही स्वबळावर ठाम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता शिवसेनेबरोबर आघाडी करण्याची शक्यता असून तशी चर्चा देखील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये ऐकण्यास मिळत आहे. कॉंग्रेसचा स्वबळाचा हट्ट कायम असेल तर आमच्याकडे देखील अन्य पर्याय खुले आहेत. मात्र भाजपबरोबर जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे पदाधिकारी उघडपणे सांगत असल्याने चिपळुणात नवीन राजकीय समीकरणे जुळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. www.konkantoday.com