
एसटी कर्मचारी तात्पुरते भावनाविवश ;ते लवकरच संप मागे घेतील- एसटी कामगारांचे नेते अजय गुजर
एसटी कामगारांचे नेते अजय गुजर यांनी त्यांच्या नेतृत्वातील संघटनेचा संप मागे घेतला आहे. यावेळी त्यांनी एसटी कर्मचारी तात्पुरते भावनाविवश झाल्याचं सांगत कुणीतरी त्यांना भडकावत असल्याचा गंभीर आरोप केला.तसेच गुणरत्न सदावर्ते यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही एसटी कर्मचारी संघटनेतर्फे दुसरे वकील लावू, असा इशाराही दिला. ते संप मागे घेतल्याची घोषणा करताना बोलत होते.
अजय गुजर म्हणाले, “एसटी कर्मचारी तात्पुरते भावनाविवश आहेत. ते लवकरच संप मागे घेतील. आम्ही त्यांना समजाऊन सांगितल्यावर ते संप मागे घेतील. या कर्मचाऱ्यांना कुणीतरी भडकावत आहे. त्यांना आम्ही व्यवस्थित समजाऊन सांगू.”
www.konkantoday.com