जिल्हापोलीस व रॉयल इनफिल्ड मोटर्स यांचे संयुक्त विद्यमाने रॉयल इनफिल्ड मोटर्स, रत्नागिरी ते आरे-वारेबीच अशी “वाहतुक नियमन जनजागृती बाईक रॅली
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे अर्थात ‘आजादी का अमृत महोत्सव’ संपूर्ण देशभरात साजराकरण्याबाबत केंद्र शासनाने सर्व राज्यांना सुचना दिलेल्या आहेत. सदर उत्सव साजरा करण्यासाठीरत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेले आहेत. याकार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज दिनांक १९/१२/२०२१ रोजी सकाळी १०.०० वा. रत्नागिरी जिल्हापोलीस व रॉयल इनफिल्ड मोटर्स यांचे संयुक्त विद्यमाने रॉयल इनफिल्ड मोटर्स, रत्नागिरी ते आरे-वारेबीच अशी “वाहतुक नियमन जनजागृती बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
सदर बाईक रॅली करीता उपस्थित रायडर्स यांना पोलीस दलाच्या वतीने मा.डॉ. मोहित कुमारगर्ग पोलीस अधीक्षक व श्री. शिरीष सासने पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा, रत्नागिरी, व रॉयलइनफिल्ड यांचे वतीने श्री. अनिल जगताप, रत्नागिरी टेलरींग प्रायव्हेट लिमीटेडचे डायरेक्टर, श्री. भरत
पटेल, रॉयल इनफिल्ड मोटर्सचे मालक यांनी खालील नमुद नवीन रहदारी नियम आणि वाढीवचलनांच्या रकमेबद्दल मार्गदर्शन केल
५००० रुपये,
१. विनापरवाना वाहन चालवणे
२. विना वैध प्रमाणपत्र २०००,
३. विना हेल्मेट-५०० व ०३ महिन्यांसाठी चलन रद्द,
४. ट्रीपल सीट -१००० आणि याशिवाय चालक परवाना ०३ महिने रद्द,
५. सार्वजनीक ठिकाणी लोकांना/वाहतुकीस अडथळा असे वाहन उभे करणे ५०० व त्यानंतर १५००,
६.२ व ३ चाकी वाहन चालवताना मोबाईल वापरणे – १००० रुपये व त्यानंतर १०,००० रुपये,
७. विना वैद्य नोंदणी वाहन चालवीणे – २००० रुपये व त्यानंतर अपराध केल्यास ५००० रुपये
८.बेकायदेशीर नंबर प्लेट लावणे- १००० रुपये
आज रोजी झालेल्या बाईक रॅली करीता पोलीस दलाचे वतीने मा. डॉ. मोहित कुमार गर्ग पोलीसअधीक्षक रत्नागिरी, मा.डॉ. इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी, श्री. सदाशिववाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी, श्री. शिरीष सासने पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा,श्री. मारुती जगताप पोलीस निरीक्षक रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे, श्रीमती गायत्री पाटील पोलीसउप निरीक्षक महिला कक्ष, तसेच ५० पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते. त्याचप्रमाणे रॉयलइनफिल्डचे वतीने श्री. भरत पटेल व श्री. हसमुख पटेल, रॉयल इनफिल्ड मोटर्सचे मालक यांचेसह
विविध तालुक्यातुन आलेले १७० रायडर्स उपस्थित होते.
www.konkantoday.com