जिल्हा परिषदेचे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे दिले जाणारे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले असून त्याचे वितरण लवकरच होणार आहे. कनिष्ठ आणि वरिष्ठ प्राथमिक शाळेतील प्रत्येक तालुक्यातील एका या प्रमाणे नऊ आणि दोन विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी दिली.
जिल्हा परिषद शिक्षण विभागात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर, सुधाकर मुरकुटे, संदेश कडव, रविंद्र कांबळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. कनिष्ठ पुरस्कार प्राप्त शाळांमध्ये लाटवण उर्दू शाळा, देहेण तळवटकरवाडी, शेरवली वरची प्राथमिक शाळा, कापरे वरची मराठी शाळा, वाडदई शाळा, फुणगूस मराठी शाळा, टिके-कांबळेवाडी नं. ३, पडवण नं. १, मुर नं. १ यांचा समावेश आहे. तर विशेष पुरस्कार शाळांमध्ये लांजा नं. २ आगरगाव शाळा. वरिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये अडखळ शाळा, कर्दे प्रा. मराठी शाळा, धवडे केंद्र शाळा, निरबाडे नं. १ शाळा, वरवेली नं. २ शाळा, डावखोल केंद्र शाळा, चांदोर नं. १ शाळा, बापेरे प्राथमिक शाळा, पाथर्डे प्राथमिक शाळा. तर विशेष पुरस्कारात आंबेड बु. नं. २ (ता. संगमेश्वर) यांचा समावेश आहे.
आदर्श शाळा पुरस्कारात जिल्ह्यातून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यामध्ये कनिष्ठ गटासाठी १६ तर वरिष्ठ गटासाठी १७ प्रस्ताव आले होते. त्यामधून प्रत्येकी दहा शाळांची निवड करण्यात आली आहे. शाळा निवडताना दाखल पात्र मुले, उपस्थितीचे शेकडा प्रमाण, शाळा सिध्दी श्रेणी, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, गावाच्या मदतीने राबवित असलेला उपक्रम, शाळेतील उपक्रम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी याचा विचार केला जातो. या पुरस्कारांचे वितरणाची तारीख अध्यक्ष, उपाध्यक्षांशी चर्चा करुन ठरवण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्यासह सर्व आमदार उपस्थित राहतील, असे श्री. मणचेकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com