
दापोली येथे अपघातात दुचाकीस्वार ठार
दापोली : दापोली-हर्णे मार्गावरील वीर सावरकर चौक येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी आहे. मंदार मनोज पवार (रा. रुपनगर, दापोली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मुरलीधर लांबे (वय 52, जालगाव, दापोली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. हा अपघात 8 मे रोजी रात्री 8.30 वा. च्या सुमारास घडला.
याबाबतची फिर्याद मुरलीधर लांंबे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. लांबे हे रात्री 8.30 वा. च्या सुमारास घरी जात असताना हर्णैमधील सावरकर चौक येथे आले असता मंदार मनोज पवार या दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने विरुध्द दिशेला जाऊन जोरदार धडक दिली. यामध्ये मंदार याला गंभीर दुखापत झाली. त्याला मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुरलीधर लांबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत दुचाकीस्वार मंदार पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गुजर करत आहेत.




