
चिपळूणच्या गाळ उपशासाठी मात्र लोकांना उपोषण करावे लागते, हे दुर्दैव आहे. पायातील हातात घेऊन जाब विचारायची वेळ आली आहे-शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी
पूरग्रस्तांना मदत करताना हात आखडता घेतला जातो; मात्र राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपुरात सरकारचा प्रचंड पैसा खर्च केला जातो. तिथे शासकीय निधीची कमतरता भासत नाही.चिपळूणच्या गाळ उपशासाठी मात्र लोकांना उपोषण करावे लागते, हे दुर्दैव आहे. पायातील हातात घेऊन जाब विचारायची वेळ आली आहे, राजकारण आणि द्वेष बाजूला ठेवून आंदोलन सुरू ठेवल्यास नक्कीच यश मिळेल, असे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढावा, लाल व निळी पूररेषा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली. चिपळूण बचाव समितीचे अरूण भोजने, सतीश कदम, बापू काणे, शिरीष काटकर यांनी उपोषणामागील हेतू स्पष्ट केला.
www.konkantoday.com